Wednesday, 31 July 2019

मुश्किल - फियर बिहाइंड यु चे निर्माता रविंदर जीत दरिया यांची धमाकेदार पार्टी


निर्माता रविंदर जीत दरीया यांच्या 'मुश्किल-फियर बिहइंड यु' या चित्रपटाच्या रिलीज तारखेपूर्वीच मित्र आणि कुटुंबियांसाठी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. अंधेरी पश्चिम येथील प्रसिद्ध सॅटेलाईट द क्लब मध्ये ह्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपटातील कलाकार, क्रू आणि इतर अतिथी सेलिब्रिटी संगीताच्या तालावर नाचत आणि स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेत दिसले. निर्माते आणि ह्या पार्टीचे होस्ट रविंदर जीत दरीया, चित्रपटाचे मुख्य कलाकार  रजनिश दुग्गल आणि कुणाल रॉय कपूर यांच्यासह दिग्दर्शक राजीव एस रुईया हे सर्वात आधी पोहचले. यानंतर पूजा बिष्ट, नाझिया हुसेन, शफाक नाज, जोर्जिया अँन्ड्रियनि, कुरुष देबू, निकितिन धीर, नवराज हंस  यांनी आपली उपस्थिती नोंदवली. 


योगायोगाने, याच वेळी या चित्रपटाच्या टीमने रोमँटिक गाणे 'नैना नैना' लाँच केले. हे गाणे गायले आहे नकुल छवछरिया आणि संगीतबद्ध केले आहे रवी चोप्रा यांनी. ह्या गाण्याचे चित्रीकरण बनारसच्या घाटांत झाले आहे. तसेच हे मधुर गाणे चित्रपटातील प्रेमात पडण्याचा प्रारंभीचा प्रवास दर्शवते.

बिग बॅट फिल्म्स बॅनरखाली निर्मित 'मुश्किल - फियर बिहइंड यु' हा चित्रपट चार मित्रांची कथा मांडतो जे एका प्रवेश बंद महालात प्रवेश करतात आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर काय घडते त्यातून ते कसे बाहेर पडतात ती गोष्ट उलगडते. दिग्दर्शक राजीव एस रुईया आणि  निर्माता रविंदर जीत दारिया यांचा 'मुश्किल - फियर बिहइंड यु' हा चित्रपट संपूर्ण देशात ९ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होईल.


No comments:

Post a Comment